35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाइंग्लंडचा संघ अबुधाबीला जाणार

इंग्लंडचा संघ अबुधाबीला जाणार

नवी दिल्ली : इंग्लंडच्या बॅझबॉल फलंदाजीची हवा काढताना भारतीय संघाने दुस-या कसोटीत १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिमाखात पुनरागमन केलेल्या भारताने १-१ अशी बरोबरी साधली. आगामी तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जवळपास १० दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ भारतात न थांबता अबुधाबीला रवाना होणार आहे. तेथे खेळाडू कुटुंबीयांसोबत वेळ घालवतील.

दरम्यान, भारतात येण्यापूर्वीही इंग्लंडचा संघ अबुधाबीत होता. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी तेथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ तिथे जाणार आहे.

त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा येथे फिरकी खेळपट्टीवर पुरेसा अभ्यास करून भारतात परतण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तिस-या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा संघ पुन्हा भारतात येईल. या विश्रांतीदरम्यान इंग्लंड संघ येथे गोल्फ खेळाचा आनंदही घेणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR