26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्र‘वर्षा’वर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका

‘वर्षा’वर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका

संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या फोटोवरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक निवृत्त पोलिस अधिकारी ‘वर्षा’वर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी हे आरोप केले आहेत.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, ‘यापुढे मी रोज असे फोटो ट्वीट करत राहणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या भेटून काय चर्चा करत आहेत. विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी मदत करणार आहात का?, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटायला गुंडांची रांग लागली आहे. ‘वर्षा’ वर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत. एक निवृत्त पोलिस अधिकारी हे घडवून आणतोय. नेहरूंनी देश आळशी बनवला, तर तुम्ही काय करताय. गुंड टोळ्यांच्या हातात देश देताय का? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो केला ट्वीट
संजय राऊतांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी-शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR