अहमदपूर : प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य , पुणे तथा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्यासंयुक्त विद्यमाने दि १ ते ४ नोहेंबर २०२३ दरम्यान शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्षीय मुलींच्या इप्पी व सेबरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली. येथे १७ गोल्ड, ६ रौप्य व १२ कास्य असे एकूण ३५ पदकांची कमाई केली आहे.
या संघात जान्हवी जाधव, स्रेहा कश्यप, साक्षी पाटील, नंदिनी केंद्रे, स्रेहल मोरे, सिद्धी कदम यांचा सहभाग होता. १४ वर्षीय मुलांच्या इप्पी संघाने तृतीय क्रमांक पटकावित कांस्य पदकाची कमाई केली. या संघामध्ये मुसैब शेख, आजान गौस, ऋषभ गुणाले, ओवेस शेख यांचा समावेश होता. तसेच १७ वर्षीय फॉईलच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. यामध्ये साकेब शेख याने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. १७ वर्षीय सेबरच्या मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावित रौप्य पदक कमवले. या संघात साईप्रसाद जंगवाड, आशिष कश्यप , करण गलाले यांचा समावेश होता.१७ वर्षीय मुलांच्या इपीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकांची कमई केली. या संघात साईप्रसाद जंगवाड , हर्षवर्धन सोमवंशी , चैतन्य मोरे यांचा समावेश होता तर १७ वर्षीय मुलींच्या ईपीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
या संघात वैभवी माने , दिव्यांका कदम, रोहिणी पाटील यांचा समावेश होता. १७ वर्षीय मुलींच्या फॉईल संघाने तृतीय क्रमांक पटकावित कांस्य पदकाची कमाई केली. या संघात वैभवी माने, नंदश्री लव्हराळे , साक्षी गोरगीळे यांचा समावेश होता आणि १४ वर्ष ईप्पी वैयक्तीक स्पर्धेत -जान्हवी जाधव – सुवर्णपदक, स्रेहा कश्यप – रौप्य पदक या दोघी गुजरात येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेस पात्र ठरल्या आहेत. १७ वर्ष मुलींच्या इप्पी वैयक्तीक प्रकारात दिव्यांका कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकाची कमाई केली आहे. लातूर येथे होणा-या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत हीची निवड झाली आहे. लातूरच्या फेंन्सरनी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत १७ -गोल्ड ,०६ रौप्य , १२-कांस्य पदक असे एकूण ३५ पदकांची कमाई करत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकाची जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे.
सर्व विजयी खेळाडूंना जिल्हा संघटनेचे सचिव-शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले, विझरुद्दीन काझी, मोसीन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे, पठाण मैफूसखान, सुरज कदम, भाऊराव कदम यांनी प्रशिक्षीत केले. या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे (अध्यक्ष) अभिजीत मोरे, वैभव कज्जेवाड, प्रकाश केंद्रे, यशवंत विद्यालयाचे मु.अ. गजानन शिंंदे, अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मु.अ. प्रशांत माने, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे संचालक कुलदीप हाके, विद्यावर्धिनी विद्यालयाचे मु.अ.सौ. सुषमा पाटील, जय ंिहद विद्यालयाचे मु.अ. सौ. वंदना भदाडे, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मु.अ. सौ.आशा रोडगे ,महात्मा फुले विद्यालयाचे मु.अ. बी.आर.काबरा, किलबिल नॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानोबा भोसले व सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.