25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमनोरंजनतितीक्षा तावडेची लगीनघाई!

तितीक्षा तावडेची लगीनघाई!

मुंबई : अभिनेत्री तितीक्षा तावडे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तितीक्षा ही अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तितीक्षाने तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं खास कॅप्शन देखील दिलं आहे. तितीक्षा शेअर केलेल्या फोटोवर नेटक-यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तितीक्षाने सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले त्याने मला डेटसाठी विचारले पण आम्ही केळवणाच्या कार्यक्रमासाठी गेलो. तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हृता दुर्गुळे, ऐश्वर्या नारकर, रसिका सुनील या कलाकारांनी तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन सिद्धार्थ आणि तितीक्षा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तितीक्षाने सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू अशी जवळी रहा, सरस्वती, असे हे कन्यादान, टोटल नादानिया या मालिकांमध्ये काम केले आहे. तितीक्षाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तिने मनोरंजनसृष्टीत विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR