27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रनिखिल वागळेंसह अडीचशे जणांवर गुन्हे दाखल

निखिल वागळेंसह अडीचशे जणांवर गुन्हे दाखल

पुण्यातील कार्यक्रमादरम्यान राडा

पुणे : पत्रकार निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह ४३ आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान अडीचशे जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणा-या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या २५० जणांवर दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता.

या आदेशाचे उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दोघेही आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. परिणामी मोठा गदारोळ झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR