नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९६.८८ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. आता भारतात जगातील सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली.
मतदारयाद्यांची फेरतपासणी करण्यात आली. अनेक कारणांमुळे १.६५ कोटी नावे मतदारयादीतून वगळली. त्यामध्ये ६७.८२ लाख मृत व्यक्ती, दुसरीकडे राहायला गेलेले ७५.११ लाख लोक, २२.०५ डुप्लिकेट मतदार यांचा समावेश आहे.
२.६३ कोटी नवे मतदार मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात १.४१ कोटी महिला आहेत. तर १.२२ कोटी पुरूष आहे. नव्या महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक आहे. ८८.३५ लाख दिव्यांगांचा समावेश आहे.
१.८५ कोटी मतदार ८० वर्षांहून अधिक वयोमानाचे आहेत. १७ वर्षांहून अधिक पण १८ वर्षे पूर्ण न झालेल्या १०.६४ लाख लोकांनी मतदार होण्यासाठी अर्ज केले आहेत.
२.३८ लाख लोक आहेत १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. १५.३० कोटी उत्तर प्रदेशात मतदार आहेत. सर्व राज्यांमधील सर्वाधिक मतदार असलेले राज्य आहे.