36.3 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाझ्या नव-याला फसविले

माझ्या नव-याला फसविले

मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचा पोलिसांवर गंभीर आरोप घोसाळकर हत्या प्रकरण

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस भाई याने शांत डोक्याने कट रचत घोसाळकर यांना संपविले. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण दहिसर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मॉरिस याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची पिस्तूल वापरली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. बॉडीगार्ड मिश्राला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली गेली आहे. त्यानंतर अमरेंद्र मिश्रा याची पत्नी सोनी मिश्रा यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आहे.

माझ्या नव-याला फसवण्यात आले आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते माझ्या नव-याचा काही दोष नाही. पोलिस त्यांना नीट वागणूक देत नसून मारहाणसुद्धा करण्यात आली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्या नव-याचा यामध्ये काही दोष नाही. या प्रकरणामध्ये माझ्या पतीला जाणीवपूर्वक ओढले जात असल्याचा आरोप सोनी मिश्रा यांनी केला आहे.

अमरेंद्र मिश्राचे वकील काय म्हणाले?
पोलिसांनी ७ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आमच्या क्लायंटचा काहीही संबध नव्हता. ते फक्त त्यांच्याकडे कामाला होते. त्यांच्या बंदुकीचा परवाना ऑल इंडिया परमिट आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी आम्ही केली होती. मात्र त्यांना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असल्याचे अ‍ॅडव्होकेट रेखा जयस्वाल यांनी म्हटले आहे.

माझ्या पतीला भेटूही दिले जात नाही
अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तेव्हा मेहुलची आई करुणा रुग्णालयात अ‍ॅडमिट आहे, तिकडे अमरेंद्र मिश्रा गेले होते. आम्हाला घटनेची माहिती पोलिसांकडून रात्री ३ वाजता मिळाली होती त्यावेळी आम्हालाही धक्का बसला. मी स्वत: माझ्या पतीला पोलिसांकडे घेऊन गेले मात्र आता माझ्या पतीला भेटूही दिले जात नसल्याचे सोनी मिश्रा यांनी बोलताना सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR