22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खान यांची हत्या होऊ शकते

इम्रान खान यांची हत्या होऊ शकते

इस्लामाबाद : जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी मोठा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या बहिणीने सांगितले की, लष्कराला इम्रान यांची हत्या करायची आहे. निवडणुकीत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर परिस्थिती काहीशी अशीच आहे.

२५० जागांवर मतमोजणी पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा आहे. बहीण अलीमा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये असे घडले की, इम्रान खान यांचा पाठिंबा असलेले उमेदवार ८० हजारांहून अधिक मतांनी पुढे असूनही त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. दिवसाढवळ्या लूटमार झाली आणि मतांची चोरी झाली. नवाझ शरीफ यांचा पक्ष फक्त ५०-६० जागा जिंकत आहे आणि त्यातही चोरी करत आहे.

दोन वेळा हत्येचा झाला प्रयत्न
अलीमा यांनी मी अद्याप इम्रान खान यांना भेटलेली नाही असे म्हटले आहे. आम्ही इम्रान यांना भेटू शकलो नाही, पण उद्या भेटू शकतो असे सांगत निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी इम्रान यांच्या हत्येचा दोनदा प्रयत्न झाला होता. कोणी केले हे आम्हाला माहीत आहे. आता तुरुंगात असताना त्यांच्या विजयानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे असेही बहिणीने म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR