25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयराम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका

राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका

नवी दिल्ली : राम हे भारताचे प्राण आहेत, २२ जानेवारी हा ५०० वर्षांच्या संघर्षाच्या समाप्तीचा दिवस आहे. हा दिवस कोट्यवधी भक्तांच्या आशा, आकांक्षा आणि सिद्धीचा दिवस आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. अयोध्येतील राममंदिराचे ऐतिहासिक बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरील चर्चेवर आज ते लोकसभेत बोलत होते.

२२ जानेवारी हा संघर्ष आणि १५२८ मध्ये सुरू झालेल्या चळवळीचा शेवट आहे. १५२८ मध्ये सुरू झालेला न्यायाचा लढा याच दिवशी संपला. ५०० वर्षानंतर अन्यायाविरोधाची लढाई आता संपली. २२ जानेवारी हा दिवस हजारो वर्षांपासून ऐतिहासिक बनला आहे. ज्यांना इतिहास आणि ऐतिहासिक क्षण ओळखता येत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात, अशा शब्दांत अमित शहा यांना विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. २२ जानेवारी ही महान भारताची सुरुवात होती. जे लोक भगवान राम नसलेल्या देशाची कल्पना करतात त्यांना आपला देश नीट माहित नाही. ते लोक वसाहतवादांच्या दिवसांचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोपही अमित शहा यांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला विरोधी करणा-या पक्षांवर केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले, आज मला माझ्या भावना आणि देशातील जनतेचा आवाज या सभागृहासमोर मांडायचा आहे. जी न्यायालयीन कागदपत्रांमध्ये वर्षानुवर्षे दफन झाली होती. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला आवाज आणि अभिव्यक्तीही मिळाली. देशाला भक्ती आंदोलनाची परंपरा आहे. राम व्यक्ती नाही, प्रतिक आहे. भारतीय संस्कृती आणि रामायण वेगळे पाहिले जाऊ शकत नाही. अनेक भाषांमध्ये, अनेक प्रांतांमध्ये आणि अनेक धर्मांमध्ये रामायणाचा उल्लेख केला आहे, रामायण अनुवादित केले आहे आणि रामायणाच्या परंपरांवर आधारित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर टीका करणे चुकीचे आहे, असे म्हणत राम मंदिर उभारणीची कोणत्या धर्मासोबत तुलना करू नये, असा सल्लादेखील शहा यांनी यावेळी विरोधकांना दिला.

पीएम मोदींवर आम्हाला गर्व
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात राम मंदिर आंदोलनाकडे दुर्लक्ष करून या देशाचा इतिहास कोणीही वाचू शकत नाही. १५२८ पासून प्रत्येक पिढीने हे आंदोलन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाहिले आहे. हे प्रकरण बरेच दिवस अडकून राहिले. मोदी सरकारच्या काळात स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत, याचा आम्हाला गर्व आहे, असेही अमित शहा म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR