18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडासानिया मिर्झाचा रोहन बोपन्नासोबत पार्टीत जल्लोष

सानिया मिर्झाचा रोहन बोपन्नासोबत पार्टीत जल्लोष

नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत असलेला संसार मोडला आहे. शोएब मलिक याने सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाह केल्यानंतर सानियाने त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा सर्व प्रकार विसरून सानिया मिर्झा सक्रिय झाली आहे. टेनिसमधील आपला जुना जोडीदार रोहन बोपन्ना याच्यासोबत एका पार्टीत सानिया मिर्झा दिसून आली. सानियाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सानिया मिर्झा हिने पार्टीत रोहन बोपन्नासोबत जल्लोष केला. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सानिया पार्टीत आली होती. रोहन बोपन्ना याने नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी रोहन बोपन्ना याने पार्टी दिली होती. त्या पार्टीत सानिया मिर्झा आली होती. सानिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिचे आगमन होताच तिचे अनेक फोटो काढण्यात आले.

सानिया कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी पोहोचली तेव्हा पॅप्सने तिला फोटो काढण्याची जागा सांगण्यास सुरुवात केली. त्याचे म्हणणे ऐकून सानियाही तिथे उभी राहिली. मात्र, यानंतर त्यांनी पॅप्सकडेही तक्रार केली. सानिया म्हणाली, ‘किती सूचना देता तुम्ही लोक?’ असं म्हणत ती स्वत:च हसायला लागली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR