मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अॅनिमलच्या दमदार यशानंतर पुष्पा २ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुष्पा २ मध्ये ती पुन्हा एकदा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत धमाल करणार आहे. यादरम्यानच, रश्मिािच्या पुढील चित्रपटाशी संबंधित काही अपडेट समोर आली आहे. पुष्पा २ ची शुटिंग संपताच ती सुपरस्टार प्रभाससोबत चित्रपट करू शकते अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, प्रभासच्या आगामी ‘स्पिरिट’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदान्नाच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान ही माहिती जर खरी ठरली आणि रश्मिका स्पिरिट या चित्रपटाचा भाग बनली तर प्रभाससोबतचा हा तीचा पहिलाच चित्रपट असेल. दोघांनीही अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत परंतु ही जोडी आतापर्यंत मोठ्या पडद्यावर एकत्र आली नाही. यामुळे चाहत्यांना प्रभास आणि रश्मिकाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करणार असून वंगा सोबत रश्मिका मंदान्नाचा हा दुसरा चित्रपट असेल. अलीकडेच संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमल चित्रपटातही रश्मिका दिसली होती.