21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीचिमुकल्यांनी भरवला आठवडी भाजीपाला बाजार

चिमुकल्यांनी भरवला आठवडी भाजीपाला बाजार

जिंतूर : येथील श्री संचारेश्वर शिशुवाटिकेत चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरवला होता. या बाजारात चिमुकल्यांनी आणलेल्या पालेभाज्या, फळभाज्या व फळे विक्रीसाठी सर्व पालकही पूर्णवेळ त्यांच्यासोबत उपस्थित होते. आपल्याकडील भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांना खूप आनंद होत होता.

श्री संचारेश्वर शिशुवाटिकेत विद्यार्थ्यांसाठी दि.९ फेब्रुवारी रोजी भाजीपाला व फळभाज्या बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. पालकांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक सुरेश अन्नदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाह रविकुमार पेशकार होते.

पालकांनी व संस्कार केंद्रातील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी सुद्धा विद्यार्थ्याकडून भाजीपाला खरेदी केला व त्यांचा आनंद द्विगुणीत केला. या उपक्रमात संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी यांचे मोलाचे सहकार्य. सूत्रसंचालन शिशुवाटिकेतील शिक्षिका मोनिका घोडके यांनी केले. प्रस्तावना वर्षा कौडगावकर तर आभार प्रदर्शन राणुबाई सुग्रामकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR