परभणी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर राजकीय पक्षासंह भाजपाने देखील जय्यत तयारी व मोर्चे बांधणी करण्यात सुरुवात केली आहे. ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान या उपक्रमात प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक बूथ मधील नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यास उस्फुर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याची माहिती भाजपा परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार राज्यातील सर्व खेडोपाडी व शहरातील सर्व बूथ यामध्ये हे प्रवासी कार्यकर्ते एक दिवस त्या गावात राहून स्थानिक नागरिक, युवक, महिला, शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय, माजी सैनिक, आशा अंगणवाडी सेविका, लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधला. यामध्ये नागरिकांकडून योजना राबविताना येणा-या अडचणी समजून घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. परभणी जिल्ह्यातील झरी या गावात भाजपा परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे हे सुद्धा या अभियानात सहभागी झाले होते. यावेळी झरी येथील स्थानिक नागरिक, युवक, महिला, शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय, माजी सैनिक, आशा अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, व्यापारी, लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधला असून आतापर्यंत गाव चलो अभियानास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.