परभणी : शहरातील जिंतूर रोडवरील आ. मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे परभणी लोकसभा प्रमुख तथा माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णा मुंदडा यांनी आज असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, माजी नगरसेवक सुनील देशमुख, सुरेश भुमरे, मंगल मुदगलकर, सुप्रिया कुलकर्णी, दिनेश परसावत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येणारी लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका व अन्य निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत.
त्यासाठी पक्ष बांधणी करून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश सोहळा घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.