परभणी : जय हिंद सेवा शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या २७ वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा सोहळा १० फेब्रुवारी रोजी आयएमए हॉल परभणी येथे थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील ३१ मान्यवरांना महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन इंजि. आर.डी. मगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रसिद्ध हिंदी कवी इमरान राही वर्धा, गफार मास्टर, माजी सभापती विशाल बुधवंत, स्वागत अध्यक्ष खदीरला हाश्मी, अॅड.निलेश पुरी निवड समिती अध्यक्ष मो इलियास कच्ची, स्वागत सचिव हाजी शरीफ शेख यांची उपस्थिती होती.
या वेळी माजी मंत्री दुधगावकर, इंजि. आर. डी. मगर, इमरान राही, बुधवंत यांची समयोचित भाषणे झाली. प्रस्ताविक आयोजक तथा संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल यांनी केले. आभार निलेश पुरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरफराज शेख, मोईन कॅप्टन, योगेश मुळी, तब्बू पटेल, मोहम्मद रईस, इनामदार शफिक चारठाणकर सुरेश पाथरकर, पाशा पटेल यांनी परिश्रम घेतले.