29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरआसुड तरी किती ओढावे... घसा झाला कोरडा

आसुड तरी किती ओढावे… घसा झाला कोरडा

लातूर : एजाज शेख
महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १०० वे नाट्यसंमेलनानिमित्त दि. १२ फेब्रुवारी रोजी लातूर शहरातून नाट्यदिंडी काढण्यात आली. या नाट्यदिंडीत वासुदेव, गोंधळी, गुगळ यांच्यासह बुरबुर मोचमासुद्धा (कडक लक्ष्मी) सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजता नाट्यदिंडी निघणार असल्यामुळे सकाळच्या प्रहरी बुरबुर मोचमा आपले सर्व बि-हाड घेऊन गंजगोलाईत हजर झाले होते. सकाळी ९ वाजते, १० वाजले, ११ वाजले तरीही नाट्यदिंडीतचा पत्ता नाही. तब्बल दीड तास उशिराने नाट्यदिंडीत निघाली. अंगावर सपासप आसुड ओढीत निघालेले बुरबुर पोचमा थकुन गांधी चौकात बसले. या रखरखत्या उन्हात आसुड तरी किती ओढावेत ना पाणी ना चहा, अशी खदखद त्यांनी व्यक्त्त केली.

नाट्यदिंडीत डामडौल होता परंतु, माणुसकी कुठेच दिसत नव्हती. पैसे मोजले असल्याने कोणीच कोणाचा विचार करीत नव्हता. सगळे व्हीआयपी रथात विराजमान होते तर रखरखत्या उन्हात वासुदेव, गोंधळी, गुगळ, बंजारा भगिणी एवढेच काय वारकरी म्हणून सहभागी झालेले लहान विद्यार्थी नाट्यदिंडीत मार्गावरुन निघालेले होते. नाट्यदिंडीतचा प्रारंभ ज्या उत्साहात झाला तो उत्साह गांधी चौकापर्यंतही टिकला नाही. त्यामुळे कलाचंतांचा एक जथ्था हनुमान चौकात, दुसरा जथ्था गांधी चौकात तर तिसरा जथ्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कजवळ होता. नाट्यदिंडी टप्प्या-टप्प्याने निघाली, असे चित्र होते.

स्थानिक कलावंतांबाबत प्रचंड उदासीनता

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने १०० वे नाट्यसंमेलन लातूरात सुरु आहे. या महोत्सवात बहुतांश कलावंत३ मुंबई-पुण्याचेच आहेत. स्थानिक कलांवंतांबाबत प्रचंड उदासीनता दिसुन येत आहे. प्रसार माध्यमातून ही बाब निदर्शनास आणुन दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक निवडक कलावंतांना सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. यासाठी कलावंतांनी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या मध्यामिक शिक्षण विभागात नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले. परंतु, नाराज झालेल्या स्थानिक कलावंतांनी या आवाहनास दाद दिली नाही. याबाबत संबंधीतांकडे चौकशी केली असता एका कलावंताची नोंदणी झाली आहे आणि एकाचा फोन आला होता, नोंद करण्यासाठी आम्ही त्याची वाट पाहत आहोत. स्थानिक कलावंतांना सादरीकरणा कार्यक्रासाठी एका तासाचा वेळ देण्यात आला आहे, असे संबंधीताने सांगीतले. परंतू, एका तासात कोणत्या कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे विचारले असता त्यांनी माहिती देणे टाळले. स्थानिक कलावंतांच्या नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने जे दोन मोबाईल फोनेचे क्रमांक दिले होते. त्यापैकी एकानेतर फोनच उचलला नाही, अशी तक्रार स्थानिक कलावंतांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR