नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक भागात लग्नसराईची घाई पाहायला मिळत आहे. चालू महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने लग्नाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. या हंगामात देशात ४५ लाख विवाह होणार आहेत. त्यामुळे या हंगामात ५.५ लाख कोटींचा व्यवसाय होणार आहे. या काळात एकट्या दिल्लीत दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीसह संपूर्ण देशातील व्यापारी वर्गात लग्नसराईची उत्सुकता पाहायला मिळत आहे. खरंतर, १५ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत चालणा-या या हंगामात देशात ४५ लाख विवाहसोहळे होतील असा अंदाज आहे. देशात होणा-या या विवाहसोहळ्यांमध्ये सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज आहे. अंदाजे ५ लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च ३ लाख रुपये असेल, तर अंदाजे १० लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च अंदाजे ६ लाख रुपये असेल. याशिवाय, १० लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति विवाह १० लाख रुपये असेल, तर १० लाख विवाहांसाठी प्रत्येक लग्नासाठी १५ लाख रुपये खर्च येईल. देशातील व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ची संशोधन शाखा कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने विविध राज्यांतील ३० वेगवेगळ्या शहरांतील व्यापारी आणि सेवा पुरवठादारांशी केलेल्या संभाषणाच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे.
या लग्नसराईच्या हंगामात एकट्या दिल्लीत ४ लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. ज्यातून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय महसूल मिळणार आहे. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी संपलेल्या लग्नाच्या मोसमात सुमारे ३५ लाख विवाह झाले होते, ज्याचा खर्च ४.२५ लाख कोटी रुपये होता. या लग्नसराईच्या काळात अंदाजे ५ लाख विवाहांचा प्रति विवाह खर्च ३ लाख रुपये असेल, तर अंदाजे १० लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च अंदाजे ६ लाख रुपये असेल असा अंदाज आहे. याशिवाय, १० लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति विवाह १० लाख रुपये असेल, तर १० लाख विवाहांसाठी प्रति लग्न १५ लाख रुपये खर्च येईल, तर ६ लाख विवाहांसाठी प्रति लग्न २५ लाख रुपये खर्च येईल. याशिवाय ६० हजार विवाह ज्यांचा खर्च प्रति लग्न ५० लाख रुपये असणार आहे, तर ४० हजार विवाह ज्यांचा खर्च १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. लग्नाची ही मागणी लक्षात घेऊन देशभरातील संबंधित व्यापा-यांनी लग्नाशी संबंधित वस्तूंचा पुरेसा साठा केला आहे. जेणेकरून ग्राहकांची पसंती आणि मागणी पूर्ण करता येईल.