21.3 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात उडतायत डासांचे थवे

पुण्यात उडतायत डासांचे थवे

पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यात डासांचे थवे आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंतु खरंच पुण्यामध्ये डासांचे थवे आले आहेत का? एकाच वेळी पुण्यात इतके डास कोठून आले? मुख्य म्हणजे, या डासांपासून लोकांना धोका आहे का? यामागील सत्यता आपण तपासून घेणार आहोत.

सोशल मीडियाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे भयानक दृश्य केशवनगर मुंढवा खराडी परिसराच्या नदीपात्रातील असल्याचे सांगितले जात आहे. हे डास मुळा-मुठा नदीच्या वर फिरताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, ज्या डासांचा थवा नदीच्या वर फिरताना दिसत आहे. त्यामुळे हे डास नक्की कोठून आले? या डासांपासून नागरिकांना धोका आहे का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा खराडी परिसरात हा जो डासांचा थवा फिरत आहे, तो खरे तर लहान कीटकांचा थवा आहे. या किटकालाच घोस्ट स्रॅक्स किंवा नॉन बायटिंग मिजेस असे म्हटले जाते. परंतु हा कीटक लोकांना चावत नाही. सध्या मुळा-मुठा नदीचा प्रवाह थांबल्यामुळे पाणी साचून राहिले आहे. अशा ठिकाणी या कीटकांना अंडी घालण्यासाठी अनुकूल असते. या कीटकांनी अंडी घातल्यानंतर त्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या पाण्यावर राहतात.

मग त्यांची कोशाअवस्था होते आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या संख्येने हे कीटक बाहेर पडतात. सध्या आपल्याला जे डास उडताना दिसत आहेत ते नुकतेच जन्माला आलेले आहेत. हे सर्व कीटक एकत्र कोशातून बाहेर पडल्यामुळे आपल्याला त्यांचा थवा दिसून येत आहे. परंतु या थव्यापासून मनुष्याला कोणताही धोका नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR