सोलापूर : यंदाच्या शिवजयंतीत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आई तु जिजाऊ या उपक्रमावर विशेष भर देण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव म घ्यवर्ती महामंडळाच्या वतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आई तु जिजाऊ या उपक्रमावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवजयंती मना-मनात शिवजयंती घरा-घरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान दयावे असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्यावर्षी पाळणा सोहळ्यासाठी सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या वंशजातील शितल मालसुरे व त्यांचे चिरंजीव रायबा मह्यालसुरे, सिंदखेड राजा राजामाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोल्हापूरातील शिवव्याख्याते दिपकराव करपे यांच्यासोबतच जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे आपल्या कुटुंबासह आणि पालिका आयुक्त शितल तेली उगले यादेखील उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या शिवजयंती दरम्यान शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणाहुन येणा-या महिला भगिनी शिवभक्तांसाठी वाहनाची स्वंतत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी पाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जो जो रे बाळा जो जो रे हे सुंदर गीत सादर केले. पाळणा सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने म हीला भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे पारंपारिक पोषाख परिधान करण्याचे आवाहन केले. छञपती शिवाजी महाराज मुर्ती
प्रतिष्ठापनेस शिवभक्तांनी मोठ्या संख्येनेउपस्थित रहावे असे आवाहन बैठकीत मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, माऊली पवार यांनी केले आहे.
या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहीते, खजिनदार सुशिल बंदपट्टे, विनोद भोसले, भाऊसाहेब रोडगे, प्रकाश ननवरे, दिनकर जगदाळे, सचिन स्वामी, देविदास घुले, वैभव गंगणे, बसवराज कोळी, लता फुटाणे, उज्वला साळुंखे, प्रा. संजीवनी साळुंखे, मनिषा नलावडे, जया रणदिवे, अश्विनी भोसले, प्रगती तिवारी, राधा पवार, चारुशिला जगदाळे, वैभवी पवार, मानसी मोरे, दीपा भोसले, सुवर्णा यादव, कांचन काळे, सविता पवार, शितल मोरे, लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.,