22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeसोलापूरकाँग्रेस पुन्हा उभी राहील : सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस पुन्हा उभी राहील : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत वाद मला चव्हाट्यावर आणायचे नाहीत, असं सांगून त्यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करणं टाळलं असलं तरीही त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांचा राजीनामा काँग्रेससाठी आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेसला बसलेल्या धक्क्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलंय. तसंच, याही परिस्थितीतून काँग्रेस पुन्हा उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. परंतु, अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं नाही. सुशीलकुमार शिंदे यांना अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, काँग्रेसवर ओढावलेली ही काय पहिलीच वेळ नाही.

इंडिया शायनिंगच्या वेळीही मोठ्या संख्येने लोक काँग्रेसमधून गेले होते. पण जे राहिले ते जिद्दीने लढले आणि त्यावेळी आमचं सरकार आलं. त्यामुळे यावेळीही असंच काहीसं होईल, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR