21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रदूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा अनेकांची प्रकृती गंभीर

दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा अनेकांची प्रकृती गंभीर

छ.संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR