25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमार्कंडेय मूर्तीची विविध ठिकाणी प्रतिष्ठापना

मार्कंडेय मूर्तीची विविध ठिकाणी प्रतिष्ठापना

सोलापूर : श्री मार्कडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित मार्कंडेय मंदिरात पाळणा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी ध्वजपूजनासोबत मंदिरात होमहवन, तसेच विविध धार्मिक विधी झाले, भगवान मार्कडेय यांच्या दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली, सकाळी मान्यवरांच्या उपस्थित मंदिरात पालखी मिरवणूक काढण्यात निघाली, भक्तांच्या साक्षीने मंदिराच्या आवारातच प्रदक्षिणा पूर्ण करून मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर, दुपारी युवा संघटनेच्या वतीने शहरातून पालखी व उत्सव मूर्तीची उत्साहात मिरवणूक निघाली, जन्मोत्सवानिमित पूर्व भागात दोनशे ठिकाणी श्री मार्कडेय महामुनीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कुठे रक्तदान तर कुठे अन्नदान करून भक्तांनी मार्कडीय जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला. मंदिरातील भाविकांना मंदिर समितीकडून महाप्रसाद वाटप झाले. जन्मोत्सव सोहळ्यात यंदा पूजेचा मान पेंटप्पा गहूम आणि राऊल कुटुंबीयांना मिळाला. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या नेतृत्वाखाली मार्कंडेय मंदिरात विधिवत सर्व पूजा व पाळणा सोहळा झाला यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी महापौर महेशकोठे, सचिव संतोष सोमा, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, रामकृष्णा कीड़धाल, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर अरकला, विश्वस्त नितीन मार्गम, पद्मशाली युवक संघटना उपाध्यक्ष नागेश बंडी, श्री मार्कडेय जनजागृती संघाचे जनार्दन पिस्के, विजय इप्पाकायल, श्रीनिवास रच्चा, वासु दोरनाल, बालराज विंगी, किसन दावत, सकल हिंदू समाज समन्वयक अंचादास गोरंटला यांच्यासह पद्मशाली मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे यांनी सकाळी मार्कडेय मंदिरातील पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. सकाळी श्री मार्कंडेय मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी पाळणा सोहळ्यात हजेरी लावली, तसेच आमदार विजयकुमार देशमुख, काग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, आनंद चंदनशिवे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती राजमहिंद्र कमटम, अंबादास बिंगी, रमेश कॅरमकोंड़ा, तिरुपती परकीपंडला आदींची उपस्थिती होती.

मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विडी घरकूल येथील संभाजी प्रशालेत सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले. यामध्ये परदेशी भाविकांनी सहभाग नोंदवून महामुनींचा जयजयकार केला. श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संघमच्या वतीने दत्त नगर रोधील कै. व्यंकटनरसू चौरप्पा सिंगम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
उत्सव खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल मान्यवरांनी पद्मशाली युवजन संघमच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. यावेळी मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली, संघमचे अध्यक्ष सुधारक गुडेली, माजी नगरसेवक शशीकांत कैची, संघमचे सचिव वोर्गस मार्गम, मुख्याध्यापिका एच. आर. मिठ्ठा, प्रेसिडेंट गोविंद चिंता, उपाध्यक्ष अंबादास जम्ला, नरेश कोल्प्याक, भूषण येले, श्रीनिवास परकीपंडला, नागेश म्याकल, साईराम मार्गम, विश्वास गज्जम आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR