27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी महायुतीचे चार उमेदवार घोषित

राज्यसभेसाठी महायुतीचे चार उमेदवार घोषित

मुंबई : महायुतीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार आज (बुधवारी) जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेतर्फे (शिंदे गट) मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

तथापि, चौथ्या उमेदवारासाठी भाजपमध्ये मंथन सुरू आहे. भाजप चौथा उमेदवार उभा करणार आहे, मात्र त्या नावावर अद्याप एकमत झालेले नाही.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. त्यातच आता भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंत्री नारायण राणे तसेच पंकजा मुंडे यांचे नाव देखील यादीमध्ये नाही.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र, आज तीन नावे जाहीर करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR