30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्यासर्वंकष वाळू धोरण आणि विद्यावेतन वाढीचा निर्णय

सर्वंकष वाळू धोरण आणि विद्यावेतन वाढीचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते बांधणी, वाळू दर निश्चिती, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ असे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे…

१. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे.
२. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार.
४. राज्य शासकीय कर्मचा-यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
५. उच्च तंत्रज्ञान वापरणा-या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
६. सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास.
७. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना.
८. राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय.
९. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश.
१०. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR