मुंबई : शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्या म्हणत याचिका मेंशंन केली आहे.
दरम्यान या प्रकरणी सुनावणीची लवकर तारीख देऊ असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला देण्यात आले. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता.
अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल
निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात येईल आणि त्यावर तातडीने सुनावणी होऊ शकते ही शक्यता लक्षात घेत अजित पवार गटाकडून त्याच दिवशी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली होती. त्यामुळे जर शरद पवारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना आपलीही बाजून ऐकून घेतली जावी असे या कॅव्हेटमध्ये अजित पवार गटाने म्हटले आहे.