नवी दिल्ली : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे दिसणे, तिची भूमिका आणि तिचा डान्स हे सारें प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले. अशातच रश्मिकाच्या नावावर आणखी एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली.
नॅशनल क्रश म्हणून रश्मिकाचे नाव गेल्या काही वर्षापासून घेतले जात आहे. खरे तर रश्मिका ही ब-याच वर्षांपासून चित्रपट विश्वात कार्यरत आहे. मात्र जेव्हा तिचा अल्लू अर्जुनसोबतचा पुष्पा द राईज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर संदीप वांगा रेड्डीच्या अॅनिमल चित्रपटामधून तिने मोठी लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे.