नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे विशेष चांदीचे नाणे जारी केले. याशिवाय त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणीही जारी केली.
ज्यांना अयोध्येला पोहोचून रामलल्लाचे दर्शन घेता येत नाही, ते घरी बसून ऑनलाइन राम मंदिराचा प्रसाद मागवत आहेत. आता लोक रामलल्ला आणि राम मंदिरावर बनवलेली चांदीची नाणीही खरेदी करू शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १५ फेब्रुवारी रोजी ३ नाणी जारी केली. यामध्ये १ नाणे रामलल्ला आणि रामजन्मभूमी मंदिर अयोध्या यावर आधारित आहे. सरकारच्या अधिकृत साइटवरूनही ही नाणी खरेदी करता येतील.
हे चांदीचे नाणे ५० ग्रॅम वजनाचे असून ९९९ शुद्ध चांदीपासून बनवले आहे. या नाण्याच्या एका बाजूला अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे चित्र आहे, तर दुस-या बाजूला रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात बसल्याचे चित्र आहे.