नवी दिल्ली : बिग बॉस ओटीटी- २ या कार्यक्रमाचा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एल्विशने त्याच्या चाहत्याच्या कानशिलात लगावली होती. तर गेल्या वर्षी रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश अडचणीत आला होता. नोएडा पोलिसांनी एल्विशसह काही सर्पमित्रांवर गुन्हा दाखल केला होता.
आता या प्रकरणाच्या एफएसएलच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये कथितपणे नशेसाठी विष वापरल्या जात असल्याच्या प्रकरणाचा जयपूर एफएसएलने तपास केला. या तपासात सापाच्या विषाचा वापर झाल्याची पुष्टी झाली आहे. कोब्रा क्रेट प्रजातीच्या सापांचे विष सापडले आहे. एफएसएलचा अहवाल आल्यानंतर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होऊ शकते का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.