सोलापूर —शिक्षण खात्यातील अधीक्षक वेतन पथक विभाग अधिकारी विठ्ठल दिगंबर ढेपे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांना त्वरित सेवेतून निलंबित करावे या मागणी करिता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले .
आंदोलनास गौतम आप्पाराव गवळी, विशाल कांबळे ,निखिल नागणे ,केशव लोखंडे, नागेश गावडे, प्रवीण होनमाने ,गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.जर जिल्हाधिकारी यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विठ्ठल दिगंबर ढेपे यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास पुढील आंदोलन 22 -2- 2024 रोजी विभागीयआयुक्त कार्यालय पुणे येथे करणार अशा आशयाचे निवेदन देण्यात आले