उदगीर : बबन कांबळे
उदगीर शहरातील एका कुंठनखान्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले असून यात दोन पिढी पीडित महिलांची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहरातील नाईक चौकातील उच्चभ्रू वस्तीतील एका कुंठणखाण्यावर गुरुवारी सायंकाळी नाईक चौकात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील श्रीनिवास रमेश पोतदार यांच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर धाड टाकली. त्यावेळी त्यांना चार महिला तीन ग्राहक पुरुष व घरमालक कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आले. त्याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत विक्रीसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे समोर आले. या पीडित महिलेचा जबाब घेतल्यानंतर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम देवकते यांच्या फिर्यादीवरून मटन खाना चालविणा-या दोन महिला घरमालक व तीन ग्राहकावर देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार रात्री एक वाजता आरोपी उच्चभू घरच्या दोन महिलांसह शंकर काशिनाथ कुंभार गिरे, सुनील युवराज चांडेश्वर, राजकुमार प्रकाश कुंभार गिरे, सर्व राहणार कमल नगर तालुका कमलनगर जिल्हा बिदर व घर मालक श्रीनिवास रमेश पोद्दार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दोन पिढीत महिलांना उदगीर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी ६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरंिवंद पवार व त्यांच्या कनिष्ठ अधिका-यांनी दिली.