लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील मराठा समाज आक्रमक होत दि. १६ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरला. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या भागात काही ठिकाणी एस. टी. बसेसवर दगडफे क करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या सूचनेनूसार एस. टी. महामंडळाच्या लातूर विभागातून उपरोक्त मार्गावर सूटणा-या बसेस सकाळपासूनच बंद केल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दि. १० फेब्रुवारीपासून केले आहे. सातव्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरुच आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासाळली असताना शासनाकडून काहींच हलचाली दिसून येत नसल्याने मराठा समाज आक्रमक होत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलकांनी एस. टी. बसेसवर दगडफे क करुन बसेसचे नुकसान केले. तसेच प्रवाशांच्याही सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपरोक्त मार्गावरील एस. टी. बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. एस. टी. महामंडळाच्या लातूर विभातून धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या मार्गावर जाणा-या बसेस सकाळी बंद करण्यात आलेल्या आहेत.