जालना : ‘ओबीसीला धक्का लागत नाही, आम्ही ओबीसीमध्ये आहोत. सरकारला सगेसोयरेची अंमलजावणी करावी लागेल, त्यांना चार महिन्यांचा वेळ सगेसोय-याची अंमबजावणीसाठी दिले होते. त्यामुळे २० तारखेला सरकारची भूमिका कळेल, अन्यथा आमची देखील २१ तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरली असल्याचा’ इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले असून, त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, ‘ उद्या जो कायदा होईल त्याचा आनंद व्यक्त केला जाईल. मोजक्या लोकांना स्वतंत्र आरक्षण हवे आहेत, मात्र, करोडो मराठ्यांना ५० टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून आरक्षण हवं आहे. त्यामुळे, २० फेब्रुवारीला लक्षात येईल की, सगेसोयरे अध्यादेशाची अंमबजावणी सरकार करणार आहे की नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मागसवर्गीय आयोगाचे अहवाल आला. पुढील आंदोलनाची दिशा आम्ही अधिवेशन झाल्यावर ठरवणार आहोत. त्यामुळे, आमदारांना विनंती आहे, सर्वांनी उद्या अधिवेशनात आवाज उठवावा आणि ओबीसीमधून आरक्षण पाहिजे अशी मागणी मराठा आमदारांनी अधिवेशनात मांडावी. सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजले जाईल. स्वतंत्र आरक्षण हा श्रीमंतांचा हट्ट आहे.
सरकार गोरगरिबांचे ऐकत नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट द्या, ज्यांच्या सापडणार नाही त्यांना सगेसोयरेचा कायदा असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. ज्यांना मोठे केले तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलत आहेत. त्यांना समाजाच्या बाजूने बोलावे लागणार आहे, ५० टक्याच्या आत आरक्षणासाठी बोलावे लागणार आहे, असेही जरांगे म्हणाले.
मराठा आमदारांनी मराठांच्या बाजूने बोलावे
सगळ्या पक्षातील मराठा आमदारांची जबाबदारी आहे की, त्यांनी समाजाच्या बाजूने बोलावे. नाहीतर ते मराठा विरोधी ठरतील. करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावर, त्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल, नाहीतर तुम्ही मराठा विरोधी आहेत. ओबीसी नेते ओबीसी बांधवांची जाण तरी ठेवत आहेत, तसे मराठा आमदारांनी मराठांच्या बाजूने बोलावे. आम्ही २१ तारखेची तयारी केली असून, २० ला काय होते त्याकडे आमचे लक्ष आहे, असेही जरांगे म्हणाले.