मुंबई : ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडणारी अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा झाला आहे. पूजाच्या होणा-या पतीचे नाव सिद्देश चव्हाण आहे. पूजाने साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर पूजाचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून तिला शभेच्छा देत आहेत.
नुकतेच अभिनेता प्रथमेश परब याचा देखील साखरपुडा पार पडला होता. तर आता पूजानेही आपला साखरपुडा उरकुन घेतला असून लवकरच ती लग्नबंधनात अडकेल.
सौंदर्याची खाण असलेल्या पूजाने अनेक चित्रपटात काम करून आपल्या चाहता वर्ग निर्माण केला आहे. नीळकंठ मास्तर, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, भेटली तू पुन्हा , बोनस आणि दगडी चाळ हे पूजाचे गाजलेले चित्रपट आहेत.