30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeपरभणीशिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार

जिंतूर : जिंतूर- सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात असे निवेदन माजी आ.विजयराव भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. शिक्षकांची संख्या कमी असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना ऊसतोडीसाठी घेवून जात आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आ. भांबळे यांनी दिला.

जिंतूर व सेलू तालुक्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे पालकांचा ओढ खाजगी संस्थांकडे जास्त होत आहे. विद्यार्थी संख्या कमी होऊन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणखी कमी केले जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत आहे. तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने गावातील पालक विद्यार्थ्यांना मजूर म्हणून ऊसतोडीसाठी सोबत घेऊन जात आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक ३४, माध्यमिक शिक्षक ११, पदवीधर शिक्षक ७८, मुख्याध्यापक १३ तर सेलू तालुक्यात प्राथमिक शिक्षक ३०, माध्यमिक शिक्षक ४, पदवीधर शिक्षक ४१, मुख्याध्यापक ११ अशा एकूण २२२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

त्यासाठी जिंतूर, सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आ. विजयराव भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, अजय चौधरी, मुरली मते, रितेश काळे, गजानन कांगणे, नंदुभाऊ अंभोरे, राहुल घुले, गणेशराव घुगे इत्यादींसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR