26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयअखेर आपचा उमेदवार चंदिगडचा महापौर

अखेर आपचा उमेदवार चंदिगडचा महापौर

नवी दिल्ली : चंदिगड महापौर निवडणुकीत अखेर आम आदमी पार्टीचा महापौर वैध ठरला आहे. सुप्रीम कोर्टानं या वैधतेबाबत घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. नुकतेच कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना बाद ठरवले गेलेले ८ नगरसेवक वैध ठरवले होते त्यानंतर हा निकाल आता बदलला आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने आदेश दिले की, महापौर निवडणुकीत बाद ठरवलेले आठ मतपत्रिका वैध मानले जातील. यामुळे सहाजिकचे आधीचा निकाल बदलला असून आम आदमी पार्टीचे महापौरपदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर घोषित करण्याचे आदेश देण्यात आले.

खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्त्यांना १२ मते मिळाली होती. तर इतर आठ मते ही चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आली. नंतर हीच आठ मते याचिकाकर्त्याच्या बाजूने असल्याचे समोर आले, अशा प्रकारे आठ मत जोडल्यानंतर याचिकार्त्याची एकूण मते २० इतकी होतात. यामुळे आमचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना चंदिगडचे महापौर म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी यापूर्वी भाजपचा नगरसेवक जिंकल्याचा निकाल अवैध ठरवला.

अखेर सत्याचा विजय
सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की अखेर सत्याचाच विजय झाला आहे. चंदिगडमध्ये महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीच्या या मोठ्या विजयाच्या चंदिगडवासियांना अनेक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR