27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरउर्दू साहित्य पुरस्कारांचे थाटात वितरण

उर्दू साहित्य पुरस्कारांचे थाटात वितरण

सोलापूर : अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनच्यावतीने आयोजित उर्दू दिनानिमित्त  उर्दू दोस्त  हा पुरस्कार मराठी बोलणाऱ्या परंतु उर्दू लिहिता-वाचायला जाणणाऱ्या आणि उर्दूवर प्रेम करणाऱ्यांना देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार काजोल राजेंद्र सोपेकर हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रकाश महानूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच साहित्य व शैक्षणिक सेवेची दखल घेऊन ख्यातनाम नाटककार व लेखक डॉ . जी.एम.पटेल यांना जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम शाळेचे मुख्याध्यापक व कवी  अशफाकअहमद सातखेड यांना शैक्षणिक सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रकाश महानवर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोशल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य इक्बाल तांबोळी हे उपस्थित होते  कुल हिंद अदबी कॉन्फरन्सचे अध्यक्ष उमरखाँ बेरिया, यांनी पाहुण्यांचे शाल बुके देऊन सन्मान केले तर उपाध्यक्ष विकारअहमद यांनी प्राप्ताविक केले  कार्यक्रमाची सुरुवात म . हुसेन बक्षी यांनी कुराण पठणाने केली.
सत्काराला उत्तर देताना काजोल सोपेकर यांनी कुल हिंद अदबी कॉन्फरन्सचे आभार मानले. डॉ.जी.एम. पटेल यांनी त्यांच्या साहित्यिक प्रवासाची माहिती दिली. अशफाकअहमद सातखेड यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचा उल्लेख केला.
या वेळी उर्दू संमेलनचे कार्यकारी मंडळाचे जावेद उस्ताद , अय्यूब नल्लामंदू , रफीक खान , म हुसेन बक्षी , सय्यद इकबाल आदि उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ . प्रकाश महानवर  म्हणाले की, त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कामगिरीतून पदवी स्तरावरील अध्यापन साहित्य तयार केले. सोलापूर विद्यापीठात एम.ए. उर्दूचा प्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे,  विद्यापीठात अरबी विषय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, उर्दूच्या संवर्धनाचे आपले विद्यापीठ भविष्यातही असेच प्रयत्न सुरूच राहतील.
             या कार्यक्रमात पुण्याचे रफिक काझी, डॉ.मुहम्मद शफी चौबदार, हारून करकमकर, अर्शद सोलापुरी प्रा बी.एच.करजगाकर, कुदूस सय्यद, फयाज शेख. अब्दुल मन्नान शेख, इक्बाल बागबान, मजहर अल्लोळी, शफीक खान अब्दुल हमीद बिलोल खान, अब्दुल गनी फूलमामडी  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रियाज वळसंगकर तर पुरस्कार विजेत्यांचे सन्मानपत्र वाचनचे काम नसिरुद्दीन आळंदकर यांनी केले. यावेळी शेवटी अय्युब  नल्लामंदू यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR