लंडन : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शमा आई-बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विराट-अनुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव ‘अकाय’ असे ठेवले आहे.
विराट-अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिले आहे. आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आम्ही आमच्या दुस-या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ अकायचे स्वागत केले आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता. अनुष्का-विराटच्या पोस्टवर नेटक-यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटक-यांसह क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुस-या प्रेग्नंसीबाबत विराट-अनुष्काने गोपनितया ठेवली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये अनुष्का दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची पहिली बातमी समोर आली होती. अभिनेत्रीचे बेबी बंपदेखील दिसून आले. पण तरीदेखील विराट-अनुष्काने यासंदर्भात गोपनियता ठेवली. अखेर आज खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.