25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरबर्फाची गुणवत्ता तपासा; नागरीकांची मागणी 

बर्फाची गुणवत्ता तपासा; नागरीकांची मागणी 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यासह शहरातील पारा ३२ अंश सेल्सिअसवर पोचल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. भर दुपारी बर्फ गोळा, उसाचा रस किंवा विविध फळांचे ज्यूस घेऊन उन्हाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न नागरीक करत आहेत. त्यामुळे गोळा किंवा ज्यूस बनवण्यासाठी उपयोगी ठरणा-या बर्फाच्या मागणीत वाढ झाली असून शहरातील आईस फॅक्टरीतून दिवसाला सुमारे १० टन बर्फ तयार होतो. तर शहरात जवळपास ७.५ टन बर्फ वितरीत केला जात. दरम्यान खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणा-या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त्त करण्यात येत आहे.
उन्हाळा सुरु  झाला की गारेगार कुल्फी, बर्फाचा गोळा, फळांचे ज्यूस आणि उसाचा रस यांच्या मागणीत वाढ होते. हे पदार्थ बनवताना बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे बर्फाच्या मागणीत आपोआप वाढ होते. लातूरमध्ये साधारणता एक ते दोन बर्फ बनविणा-या फॅक्टरी आहेत. या कंपनीत जवळपास चार ते पाच टन बर्फ सकाळी व सायंकाळच्या सत्रात बनतो. बर्फाची एक लादी १५० किलोची असते. सध्या १५० किलोच्या लादीचा भाव हा ४०० रुपये आहे. जिल्ह्याात सध्या उन्हाचा पारा हळूहळू वाढत चालला असून रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणा-या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चुकीची हाताळणी करण्यात येत असल्याने बर्फ दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे.
 बर्फ कारखान्यातून बर्फ वाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानापुढे जमिनीवर टाकला जातो व हजारो नागरिक वाहने जातात त्या ठिकाणी पडलेला असतो तरीदेखील नागरी जीवला थंडावा मिळण्यासाठी थंड पेय पिताना दिसतात. सध्या उन्हाळाची सुरुवात आहे. त्यामुळे उकाड्यात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांकडून उसाचा रस, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, जूस सेंटर तसेच बर्फापासून तयार करणा-या विविध खाद्य पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बर्फालाही मोठी मागणी होत आहे. परंतु शहरातील व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठ वाहनाचा वापर करणायत येत आहे. त्यासोबत बर्फ कुठल्या पाण्याने तयार होतो? ते पाणी शुद्ध आहे का नाही?  याचीही अन्न व औषध प्रशासनाने तपास करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता संभावते. सध्या शहराच्या विविध ठिकाणी रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांच्या फोडी, कुल्फी, पेप्सी आदीची दुकाने रस्त्यांच्या कडेला थाटली असून सूर्यदेव आग ओकत आहे. त्यामुळे शहरातील थंड पियाने हाउस फुल असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्वांमध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR