16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीय‘बायजू’ भोवती ‘ईडी’ ने फास आवळला!

‘बायजू’ भोवती ‘ईडी’ ने फास आवळला!

मुंबई : स्टार्टअपमधून यूनिकॉर्न बनलेली कंपनी ‘बायजूस’च्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एनफोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्याविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे.

याआधी रवींद्रन यांच्याविरोधात एलओसी ‘ओन इंटिमेशन’ जारी करण्यात आले होते. यात इमीग्रेशन अधिकारी एखादा व्यक्ती बाहेर जात असेल, तर संबंधित यंत्रणेला कळवतात. पण त्याला देश सोडण्यापासून रोखत नाही. आता लुकआऊट सर्कुलर जारी केल्यानंतर रवींद्रन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत.

‘बायजूस’वर फेमा अंतर्गत आरोप झाले असून ईडी त्याची चौकशी करत आहे. कंपनीवर २,२०० कोटी रुपये परदेशातून घेतल्याचा आरोप आहे. त्याशिवाय कंपनीवर असाही आरोप आहे की, त्यांनी बेकायदरित्या ९ हजार कोटी रुपये देशाबाहेर पाठवले. कंपनीने २०२१ साली परदेशी बाजारातून जवळपास १.२ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ८ महिन्यांनी कंपनीने सांगितले की, त्यांच्या ऑडिटेड रिजल्टला विलंब होत आहे. ऑगस्ट महिन्यात कॉर्पोरेट मंत्रालयाने आर्थिक माहिती द्यायला १७ महिने विलंब का लावला? म्हणून कारण विचारले. तिथूनच कंपनीच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली.

पगार देण्यासाठी संपत्ती गहाण ठेवली
एकवेळ अशी होती की, ‘बायजूस’ची देशातील यशस्वी स्टार्टअप्समध्ये गणना व्हायची. आता कंपनी आपले अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. बायजूसच्या परदेशी फंडिंगची चौकशी सुरु झाली आहे. कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगचा पैशांची हेरा-फेरी केल्याचा आरोप आहे. परिस्थिती अशी आहे की, कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना आपली पेरेंट कंपनीच्या कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी स्वत:ची आणि कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवावी लागली आहे. जेणेकरुन १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. त्यांनी आपले सर्व शेअर गहाण टाकले आहेत. आपल्या गुंतवणूकीचे काय होणार? ही भीती कंपनीच्या गुंतवणूकदारांना सतावत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR