पुणे : सहायक कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असतो. हे कर्मचारी ख-या अर्थाने संस्थेचा गाडा हाकत असतात. असे असले तरी या कर्मचा-यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, व त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती त्यांनी अंगी जोपासायला हवी. कारण शिकत राहिल्यास आयुष्यात प्रत्येकाचा उत्कर्ष नक्की होतो, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे सहायक कर्मचा-यांसाठी आयोजित व दोन महिने चाललेल्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. अतुल पाटील, डॉ. मोहन मेनन, विठ्ठल चालीकवार, प्रा. श्रीकांत गुंजाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. चक्रदेव, डॉ. चोपडे, डॉ. निलवर्ण यांनी देखील भाषण करताना कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. यासह वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.