30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरसदनिकांची नोंदणी नसल्यास दरमहा दोन टक्के दंड : लोकरे

सदनिकांची नोंदणी नसल्यास दरमहा दोन टक्के दंड : लोकरे

सोलापूर- शहरासह हदवाढमघोल सदनिका (अपार्टमेंट) व रो-हाऊसचे बांधकाम करून वापर परवाना घेतला तसेच विक्री करून वापरास सुरूवात केली. मात्र, महापालिकेकडील मिळकत कर विभागाकडे नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार आणि विकसनकार यांनी येत्या मार्चअखेर आपल्या सदनिकांची नोंद करून घ्यावी अन्यथा दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे.

महानगरपालिका शहर तसेच हद्दवाढमधील बरेच मिळकतदार तसेच विकासक यांनी खुल्या जागा अथवा जुने बांधकाम काढून सदनिका (अपार्टमेंट) व रो-हाऊसचे बांधकाम केलेले आहे. तसेच वापर परवाना घेऊन विक्री करुन वापरास सुरूवातदेखील केलेली आहे. मात्र महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नाही. अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी आपल्या सदनिकांची नोंद करुन घेणे बंधनकारक आहे. जे मिळकतदार मिळकत कर विभागाकडे नोंद करून करून घेणार नाहीत त्यांना पुढील वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. मिळकतदार व विकसनकार यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका कर विभागाचे उपायुक्त लोकरे यांनी केले आहे.

मार्च २०२४ अखेरपर्यंत मिळकत कर विभागाकडे नोंद करून मिळकत कराची आकारणी करून घेतल्यास ज्या वर्षापासून आकारणी करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे, असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR