24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरलसणाच्या दरात ५० टक्क्यांनी घसरण

लसणाच्या दरात ५० टक्क्यांनी घसरण

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून लसणाच्या वाढलेल्या किमतींमुळे गृहीनीना आता दिलासा मिळणार आहे. शहरातील बाजारात मध्य प्रदेशानंतर आता राजस्थानमधून लसणाच्या नवीन पिकाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा सुर झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात लसनाच्या भावात किलोमागे  १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी लसणाचे पीक कमी झाले होते. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी लसणाचा पुरवठा कमी होऊ लागल्याने लसणाचे भाव हळूहळू वाढू लागले. लसणाच्या दरात ५० टक्क्यांनी घसरण झाली आहे.
लसून व्यापारी बागवान यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात लसणाच्या दराने किलोमागे ४०० रुपयांचा आकडा गाठला होता. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात लसपाचे भाव ४०० रुपये किलोच्या वर पोहोचले होते. मात्र मध्यप्रदेशपाठोपाठ आता राजस्थानमधूनही लसणाच्या नवीन पिकाचा पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे शहरातील महात्मा फुले बाजार समितीत मोठी आवक होण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील किरकोर बाजारात सध्या लसूण १२० रुपये किलोने विकला मिळत असल्याने गृहनी मात्र जोरात आहेत.
शहरातील बाजार समितीत मध्य प्रदेशातून तसेच राजस्थानमधून लसणाचा पुरवठा बाजारपेठेत केला जात असल्याचे व्यापारी यांनी एकमतशी बोलताना सागीतले. लसनाचे दर घसरल्याने गृहीनीला आता दिलासा मिळाला आहे. बाजारात नवीन लसूणाची आवक वाढल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दर कमी होतील. असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे. नवीन ओला लसूण बाजारात दाखल होन्यास सूरूवात झाली आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापुर्वी ४०० ते ४२० रुपये किलोवर असलेला लसूण आता  १२० रुपये किलोने विक्री होत आहे.
नुकताच काढणी झालेला ओला लसूण बाजारात आल्याने मागणीही वाढली आहे. मध्य प्रदेशातून येणा-या नवीन लसूणाची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सध्या बाजारात केवळ पांढरा संकरित लसूण उपलब्ध होत आहे. बाजारात आवक वाढल्याने शहरातील विविध भागांमध्ये हातगाडी व रिक्षांमधून विक्री होत आहे. हे लसून खरेदी करण्यासाठी महिलांकडून पसंती दिली जात आहे. पावकिलो लसून खरेदी
करणा-या महिला आता एक ते दोन किलोवर लसून खरेदी करताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR