27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रनिवासी डॉक्टरांकडून संप मागे

निवासी डॉक्टरांकडून संप मागे

मुंबई : निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेत असल्याची घोषणा रविवार दि. २५ रोजी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच निवासी डॉक्टर त्वरीत कामावर रुजू होणार आहेत. राज्य सरकारकडून १० हजार रुपये विद्या वेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंट्रल मार्डने वेतन वाढवल्याने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व रहिवासी आणि मार्ड प्रतिनिधींचे आभार मानतो. निवासी डॉक्टरांच्या संपात सक्रिय सहभाग घेतला आणि एकता दाखवली. त्यामुळेच निवासी डॉक्टरांचा हा अभूतपूर्व विजय झाला. निर्णायक उपाययोजना केल्याबद्दल आम्ही केंद्रीय मार्डचे आभारी आहोत. केंद्रीतील मार्ड आणि राज्यातील निवसी डॉक्टरांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच सेंट्रल मार्डने पत्राद्वारे म्हटले आहे.

आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार ,मंत्री हसन मुश्रीफ , एमईडीडीचे सचिव दिनेश वाघमारे , आयुक्त जीव निवतकर , डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे आभार मानतो, असे मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालय व संबंधित पदाधिका-यांनी तत्परतेने काम करावी आणि मागण्या अधिकृतपणे पूर्ण झाल्याची खात्री करा, असेही मार्डने नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR