28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरलातूरचा ‘किशोरकुमार’ सुधीर हिबारे यांचे निधन 

लातूरचा ‘किशोरकुमार’ सुधीर हिबारे यांचे निधन 

लातूर : प्रतिनिधी
लातूरचा किशोरकुमार अशी ओळख असलेले ऑर्केस्ट्रा गायक कलावंत सुधीर किशनराव हिबारे यांचे दि. २९ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने लातूरचा किशोरकुमार हरवल्याची भावना असंख्य कलावंतांनी व्यक्त केली.  स्व. सुधीर हिबारे गेल्या काही वर्षांपासून तुळजापूर येथे स्थायीक झाले होते. तुळजापूर येथेच त्यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, भाऊ असा परिवार आहे. छोटू हिबारे हे त्यांचे लहान बंधू होत.
इ. स. १९७०-८० च्या दशकात लातूर शहरातील महाविद्यालयांतील स्थानिक हौशी युवक, युवती कलावंतांनी ऑर्केस्ट्रा चळवळ उभी केली होती. फे्र न्डस म्युझिकल नाईट, दत्तराज ऑर्केस्ट्रा, झन्कार म्युझिकल नाईट, असे असंख्य ऑर्केस्ट्रा गु्रप होते. या सर्वच ऑर्केस्ट्रांमध्ये किशोरकुमार महंमद रफी, मुकेश, मन्नाडे, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, आशा मंगेशकर यांच्या आवाजात हुबेहुब गाणाने अत्यंत गुणी कलावंत होते. त्यांच्यापैकीच एक सुधीर हिबारे होते. ते किशोरकुमार यांचे गाणे गायचे. किशोरकुमारच्या आवाजाची त्यांना देण होती त्यामुळेच त्यांची लातूरचे किशोरकुमार, अशी ओळख होते. त्यांच्या निधनाने लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून अ‍ॅड. वैभव सूर्यवंशी, किशोर कांबळे, नबी शेख, विनोद देशपांडे, एजाज शेख, हिरा शेख, अ‍ॅड. शिरीष दहिवाल आदींनी स्व. सुधीर हिबारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR