मुंबई : प्रतिनिधी
ब्रँडेड औषधाच्या तुलनेत जेनेरिक औषधाच्या किमती फार कमी आहेत. त्यात केंद्र सरकारने जेनेरिक औषधांच्या वापराला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जेनेरिक मेडिकल दुकानांना परवानगी दिली. त्यामुळे जेनेरिक औषधांना मागणी वाढली आहे. दरम्यान, आता राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांत जेनेरिक औषध उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने याला परवानगी दिली. त्यासाठी ३ कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
अलिकडे ब्रँडेड कंपनीच्या औषधाच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे औषधासाठी फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे अलिकडे वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधी उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधी उपलब्ध होणार आहे. याचा सर्वसामान्य रुग्णांना फायदा होणार आहे. कारण कमी पैशात ही औषधी उपलब्ध होणार आहे.
रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारासाठी नियमित गोळ््या घ्याव्या लागतात. त्यासाठी दरमहा हजारो रुपयांवर खर्च येतो. यासोबतच नियमित आजारासाठीही औषधाचा खर्च मोठा आहे. हा खर्च आता सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे. आता जेनेरिक औषधी सर्वत्र उपलब्ध झाली आहे. ब्रँडेडच्या तुलनेत ही औषधी स्वस्त आहे. त्यामुळे ही औषधी वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत होती. आता ती मागणी मान्य झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयात आता ही जेनेरिक औषधी उपलब्ध होणार आहे.