वॉशिंग्टन : ५० वर्षांनंतर एक अमेरिकन अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. १९७२ मधील शेवटच्या अपोलो मोहिमेपासून, एक अमेरिकन निर्मित अंतराळ यान आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. चंद्रावर उतरलेल्या या अवकाशयानाचे नाव ओडिसियस आहे. हा सहा पायांचा रोबोटिक लँडर आहे जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मालापर्ट ए नावाच्या विवरात उतरला. चंद्राचा दक्षिण ध्रुव हा तोच भाग आहे, ज्याच्या जवळ भारताचे चांद्रयान-३ चे विक्रम लँडर उतरले होते. दरम्यान, ओडिसियस अखेरचा निरोप घेताना चंद्रकोरीप्रमाणे दिसणा-या पृथ्वीचा अप्रतिम फोटो घेतला आहे.
हा फोटो २२ फेब्रुवारीला काढला असून चंद्रकोर पृथ्वीचे दर्शन घडवत आहे.
हे एका खाजगी कंपनीचे लँडर होते आणि त्याला नासाचे पूर्ण सहकार्य होते. चंद्राच्या बाबतीत, नासा व्यावसायिक चंद्र पेलोड सेवा कार्यक्रमांतर्गत खाजगी कंपन्यांना आर्थिक मदत करत आहे. नासा अनेक प्रयोगांसाठी कंपन्यांना प्रायोजित करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, आणखी एक अमेरिकन कंपनी एस्ट्रोबायोटिकचे मिशन पेरेग्रीन वन चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरले.