22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeराष्ट्रीयआंध्रातील रेल्वे अपघाताला लोको पायलट जबाबदार

आंध्रातील रेल्वे अपघाताला लोको पायलट जबाबदार

लोको पायलट मोबाईलवर क्रिकेट पाहत होता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील २९ ऑक्टोबर २०२३ रोजी अलमांडा-कंकटापल्लीजवळ येथे एका पॅसेंजर ट्रेनची दुस-या पॅसेंजर ट्रेनला धडकली होती. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. दोन गाड्यांमधील टक्कर झाल्यामुळे झालेल्या या भीषण अपघाताचे कारण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

एका ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक त्यांच्या फोनवर क्रिकेटचा सामना पाहत होते. अशा स्थितीत निष्काळजीमुळे २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन गाड्यांमध्ये धडक झाली आणि या अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे मंर्त्यांनी दिली आहे. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रायगडा पॅसेंजर ट्रेनने आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली. या अपघातात ५० हून अधिक जण जखमीही झाले होते. रेल्वे मंत्री यावेळी बोलताना म्हणाले, आंध्र प्रदेशात नुकतीच ही भीषण घटना घडली, कारण ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक दोघेही क्रिकेट सामना पाहत होते आणि त्यांचे लक्ष विचलित झाले. आता आम्ही अशा कोणत्याही विचलित होऊ नयेत अशा यंत्रणा बसवत आहोत की ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक दोघेही ट्रेन चालवण्यावर लक्ष केंद्रित करतील.

सुरक्षेला प्राधान्य
आम्ही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत राहू. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही त्यावर उपाय शोधतो असेही ते पुढे म्हणाले. रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ने केलेला तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नसला तरी, अपघाताच्या एका दिवसानंतर रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत रायगडा पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक या दोघांना भीषण अपघातासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR