21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeराष्ट्रीयमुलांचे धर्मांतर कसे केले? सीमा हैदरला ११ कोटींची नोटीस

मुलांचे धर्मांतर कसे केले? सीमा हैदरला ११ कोटींची नोटीस

नवी दिल्ली : पब्जी गेम खेळताना सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला प्रेमात भारतीय सचिनच्या प्रेमात पडली. नेपाळमार्गे भारतात आली. प्रियकर सचिन याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. तिच्यावर पाकीस्तानी हेर असल्याचा आरोप झाला. तेव्हापासून सुरु झालेल्या तिच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाहीत.

आताही सीमा हैदर आणखी एका वेगळ्या अडचणीत सापडली आहे. सीमा हैदर हिच्यासह पती सचिन आणि एका वकिलाला नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल ११ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या नोटीसमध्ये मुलांचा धर्म कसा बदलला अशी विचारणाही करण्यात आली.

सीमा हैदर हिचा पाकिस्तानमधील पहिला पती गुलाम हैदर याने आपल्या वकिलामार्फत तिला नोटीस पाठविली आहे. हरियाणातील पानिपत येथील वकील मोमीन मलिक यांच्यामार्फत गुलाम हैदर याने सीमा हैदर, तिचा पती आणि मानलेला भाऊ यांना ही नोटीस पाठविली आहे. वकील मोमीन मलिक यांनी सीमा हैदर हिचा भाऊ वकील डॉ. ए. पी. स्ािंग यांना ५ कोटी तर, सीमा हैदर आणि तिचा भारतीय पती सचिन यांना प्रत्येकी ३ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली आहे. या तिघांनीही जाहीर माफी मागावी आणि दंडाची रक्कम महिनाभरात जमा करावी, अन्यथा तिघांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

गुलाम हैदर यांचे वकील मोमीन मलिक यांनी या नोटीसमध्ये त्यांच्या अल्पवयीन मुलांचा धर्म कसा बदलला, अशी विचारणाही केली आहे. कायद्यानुसार जर एखाद्या मुलाचा धर्म बदलायचा असेल तर त्याला त्याची माहिती द्यावी लागते. यामध्ये मुलांच्या वडिलांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ही प्रक्रिया का पाळली गेली नाही? मुलांचा धर्म बदलताना वडिलांना का विचारले नाही अशी विचारणाही या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR