17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरअन् महिला डॉक्टरांनी घेतली आकाश भरारी

अन् महिला डॉक्टरांनी घेतली आकाश भरारी

लातूर : पॅरामोटरिंग या साहसी खेळात सहसा तरुणांची नावे पुढे असतात तथापि हे आव्हान स्विकारत येथील सात महिला डॉक्टरांनी आकाश भरारी घेतली.  पॅरामोटंिरगचा मनसोक्त आनंद लुटला अन् अशा  साहसातही  ‘हम भी कुछ कम नही’, याचाच दाखला या भगिणींनी महिला दिनी दिला.
या पॅरामोटरिंग मागचा किस्सा मोठा रंजक आहे. सामाजिक, शैक्षणिक अन वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख देणा-या येथील डॉ. शुभांगी राऊत, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. श्वेता काटकर, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. सुवर्णा कोरे, डॉ. गीतांजली  सुडके व सुरेखा गरड या महिला दरवर्षी महिला दिनी काहीतर हटके करतात २०२४ चा महिला दिनही त्यास अपवाद राहीला नाही. या दिनी आपण आकाश भरारी घ्यावी असे यातील काही मैत्रीणींना वाटले अन ही इच्छा त्यांनी एकमेकींना बोलून दाखवली. म्हणतात ना इच्छा असते तिथे मार्ग मिळतो त्याप्रमाणे त्यांना तो मार्ग गवसला.  दरम्यान त्यांच्या ग्रुपमधील डॉ.  मंजुषा कुलकर्णी यांचा मुलगा ऋषिकेश बेस्ट पॅरामोटरिंग करतो त्याने इंग्लडमध्ये पॅरामोटरिंगच  प्रशिक्षणही घेतले आहे.
 तो पायलटही आहे अशी माहिती  या मैत्रिणींना मिळाली आणि त्यांनी थेट  कुलकर्णी ताईंशी संपर्क साधला सारे काही ओके झाले. दरम्यान ऋषिकेशही स्वता आला. पॅरामोटरिंसाठी लातूर नजीक असलेल रामेगाव शिवार निवडण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या भल्या पहाटे या मैत्रिणी भरारी घेण्यास रामेगावला गेल्या अन त्यांनी पॅरामोटरिंग केल. अनेक सखींना हा अनुभव नवखा होता तर काही जणिंनी सुमद्रकिनारी पॅरामोटरिंगचा अनुभव घेतला होता. नवख्यांच्या मनात प्रारंभी भीती असेलही परंतु ऋषिकेशने केलेल्या योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळ सारे काही यशस्वी झाले, हा अनुभव आम्हाला वेगळा आनंद देणारा आमच्यातील आत्मविश्वास अदृढ करणारा आणि होय आम्हीही आकाश भरारी घेवू शकतो हे सांगणारा होता, असे या महिलांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR