मुंबई : एका टीव्ही अभिनेत्रीने सात वर्षांची असताना टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर इतका मोठा चाहतावर्ग आहे, की फॉलोअर्सच्या आकड्यात तिने बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खानलाही मागे टाकले आहे. ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दुसरी तिसरी कोणी नसून जन्नत जुबेर आहे.
दरम्यान, फिल्म इंडस्ट्रीत असे अनेकजण आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून एण्ट्री केली. चाईल्ड आर्टिस्ट बनून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप तर सोडलीच. पण मोठं झाल्यानंतर जेव्हा ते इंडस्ट्रीत परतले, अशीच स्टोरी जन्नत जुबेरची आहे.
जन्नतने वयाच्या सातव्या वर्षी ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘दिल मिल गए’ या गाजलेल्या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली. या मालिकेमुळे जन्नत विशेष लोकप्रिय झाली. जन्नतला ‘काशी अब ना रहे तेरा कागज कोरा’ या मालिकेमुळेही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर तिने ‘फुलवा’मध्ये भूमिका साकारली. या दोन्ही मालिकांमुळे जन्नतचे नशीब चमकले आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे मार्गही मोकळे झाले. ‘लव्ह का द एंड’ या चित्रपटात तिने श्रद्धा कपूरच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती.
जन्नतला इन्स्टाग्रामवर कोट्यवधी लोक फॉलो करतात. फॉलोअर्सच्या बाबतीत तिने शाहरूख खानलाही मागे टाकले आहे. जन्नतचे इन्स्टाग्रामवर ४९.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर शाहरूखचे ४६.५ फॉलोअर्स आहेत. फक्त शाहरूखच नाही तर तिने करीना कपूर आणि सारा अली खान या अभिनेत्रींनाही मात दिली आहे. साराचे इन्स्टाग्रामवर ४५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर करीना कपूरचे १२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
काही रिपोर्टनुसार, जन्नतची एकूण संपत्ती २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. ती दर महिन्याला जवळपास २५ लाख रुपये कमावते. ‘खतरों के खिलाडी’ या शोसाठी जन्नतला इतर स्पर्धकांपेक्षा सर्वाधिक मानधन मिळाले होते. या शोच्या एका एपिसोडसाठी तिने १८ लाख रुपये फी घेतली होती. तर इन्स्टाग्रामवर प्रमोशनल पोस्टसाठी ती दीड ते दोन कोटी रुपये घेते.